गुन्हेपुणेमहाराष्ट्रसामाजिक

टाकळी हाजीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ९ जणांसह १५ अनोळखी व्यक्तींवर गुन्हा, प्रकरण दडपण्याचा आरोप

कुकडी पट्टयात वाढतीय पुन्हा गुंडगिरी

शिरूर | प्रतिनिधी :  टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे अल्पवयीन मुलीवर कथित लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका युवकासह त्याच्या कुटुंबीय व नातेवाईकांसह एकूण आठ जणांविरुद्ध तसेच अन्य १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पीडित कुटुंबीयांकडून हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
योगेश साळवे, नंदा साळवे, तृप्ती उचाळे, वैभव उचाळे, सोमनाथ घोडे, महेश साळुंके, ओंकार दिलीप जाधव (सर्व रा. टाकळी हाजी), समाधान दुडे (रा. निमगाव दुडे), तानाजी केदारी (रा. फाकटे) यांच्यासह अन्य १५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जून २०२६ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत मुख्य आरोपीने मुलीच्या अल्पवयाचा व अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यावर वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
फिर्यादीनुसार, पोलिसांत तक्रार दाखल होऊ नये यासाठी आरोपींकडून दबाव टाकण्यात आल्याचा तसेच टाकळी हाजी येथे फिर्यादींच्या घरी झालेल्या तडजोडीच्या बैठकीत पीडित कुटुंबाला दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या परिसरात गेल्याच महिन्यात एका दुकानावर रात्री हायवा ट्रक घालून दुकानदाराच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची घटनाही घडली होती. त्या प्रकरणातही गुन्हा दाखल असून आरोपी अद्याप मोकाट असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. तसेच निघोज येथील एका सराईत गुन्हेगाराला सुपारी देऊन हा प्रकार घडवून आणल्याची चर्चाही परिसरात आहे .
अलीकडील गंभीर घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची आणि सर्व प्रकरणांचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी जोर धरत आहे. शाळा महाविद्यालयाच्या परिसरात ही काही टुकार गँग मोटरसायकलीवर चकरा मारत असतात, त्यामुळे पालकांचीही चिंता वाढत चालली आहे . बलत्कारांचा हा गुन्हा भयंकर असून आरोपीवर अजून काही कलमे दाखल होण्यांची शक्यता आहे .

आपले राज्य

ज्वलंत प्रश्नावर आवाज उठविणारे हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page