पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

आषाढीवारीत ‘संवादवारी’; लोककल्याणकारी योजनांच्या जागरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विलासराव रोहीले/पुणे, दि. १३: आषाढी वारीत राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांनी होण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे ‘संवादवारी’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज लोणी काळभोर, यवत, सासवड व जेजूरी येथे आयोजित या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

या उपक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६, महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण, प्रधानमंत्री पीक विमा योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, कृषी विभागाचे डिजीटल उपक्रम, हरित उर्जा, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, कौशल्य विकास व गुंतवणूक, महात्मा फुले जन आरोग्य योजना, कामगार कल्याण योजना दिव्यांग सक्षमीकरण, महाराष्ट्र रोजगार हमी, शास्वत जलसंपदा व्यवस्थापण व विकास, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, आश्रम शाळा सुविधा, नमो शेतकरी महासन्मान निधी, महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण

आदी योजनांबाबत आकर्षक एलईडी चित्ररथ तसेच पथनाट्य व प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्यात येत आहेत.

आपले राज्य

ज्वलंत प्रश्नावर आवाज उठविणारे हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page